kd Mumbai

शॉर्टकट आणि पासवर्ड!

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणींतील एक असते शॉर्टकट्सची. हे शॉर्टकट्स कसे तयार करायचे? एखादी फाइल दुसऱ्यानं वाचू नये असं वाटत असेल तर कोणता मार्ग आहे याचा घेतलेला वेध...


<a href="http://blogkatta.netbhet.com/" target="_blank"><img alt="Netbhet.com" src="http://goo.gl/xXPJ9" /></a>


मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरताना भरपूर शॉर्टकट्स उपयोगी पडतात. उदा. मजकूर पेस्ट करायचा असेल तर कंट्रोल व्ही, सगळा मजकूर एकदम सिलेक्ट करायचा असेल तर कंट्रोल ए वगैरे. हे शॉर्टकट्स अगदी प्राथमिक आहेत. ते डिफॉल्ट असतात. परंतु बऱ्याच बाबतीत शॉर्टकट्स नसतात. ते तुम्हाला तयार करता येतात, तुमच्या मजीर्प्रमाणे. त्यासाठी वर्ड ओपन करा. टूल्सवर जाऊन नंतर कस्टमाइजवर क्लिक करा. मग टूलबार्स, कमांड्स आणि ऑप्शन्स असे तीन प्रकार दिसतील. टूलबारमध्ये तुम्हाला जी जी ऑप्शन्स हवी आहेत ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. मात्र अधिकधिक सुविधा हव्यात म्हणून भरमसाठ ऑप्शन्सवर क्लिक करू नका. कारण मग नको ती अॅप्लिकेशन्स तुम्हाला दिसत राहतील. त्याचा प्रत्यक्ष उपयोग असेलच असे नाही.


काहींचा मात्र होईल. उदा. तुम्ही वर्डमध्ये काही मजकूर टाइप करत आहात. आपले नेमके किती शब्द झाले हे कसे शोधाल? त्यासाठी वर्डच्या टूल्समध्ये जाऊन कस्टमाइजवर क्लिक करा. टूलबारच्या विभागात वर्ड काऊंट असे लिहिले असेल ते सिलेक्ट करा. क्लोज करून बाहेर पडा. आता वरच्या बाजूला रिकाऊंट असे दाखवणारा छोटा बार आला असेल. त्या रिकाऊंटवर क्लिक केलेत की मजकुराचे किती शब्द झाले आहे ते कळेल. या 'कस्टमाइज' बॉक्समध्ये खाली उजव्या बाजूला 'कीबोर्ड' असे असेल त्यावर क्लिक करा. कॅटेगरी आणि कमांड असे दोन बॉक्स दिसतील. त्यातली कॅटेगरी निवडा. समजा 'फाइल' कॅटेगरी आणि 'फाइल न्यू' अशी कमांड निवडलीत. याचा शॉर्टकट तुम्हाला तयार करायचाय असे समजा. याचा आधीच काही शॉर्टकट असेल तर तो 'करंट कीज' याखाली दिसेलच. नसला तर ती जागा रिकामी राहील.

बाजूलाच 'प्रेस न्यू शॉर्टकट की' असे दिसेल. त्याखालील मोकळ्या जागेत तुम्ही ती की (समजा कंट्रोल एन) दाबा. तिथे तुम्ही काही टाइप करायला गेलात तर मात्र काही टाइप होणार नाही. कंट्रोल एन असेच तुम्हाला दाबावे लागेल. नंतर तुम्ही वर्ड ओपन करून जेव्हा कंट्रोल एन दाबाल तेव्हा आपोआप नवीन फाइल ओपन होईल. अशाच शॉर्टकट कीज तुम्ही तयार करू शकता. सध्याचा शॉर्टकट बदलून दुसराही देता येईल. त्यासाठी 'करंट कीज' मधला शॉर्टकट सिलेक्ट करा व नंतर खालील 'रिमूव्ह'वर क्लिक करा. नंतर वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही नवा शॉर्टकट तयार करू शकता.

पासवर्ड द्या...

तुम्ही वर्डमधली फाइल तयार केलीत आणि ती इतरांना कोणालाच ओपन करता येऊ नये असे वाटले तर? किंवा ओपन केली तरी त्यात बदल करता येऊ नये असेही वाटू शकेल. तसे करणे सहज शक्य आहे. तुमची वर्डची फाइल ओपन करा. 'फाइल'मध्ये जाऊन 'सेव्ह अॅज' असे म्हणा. एक बॉक्स ओपन होईल. त्यावर वरती सर्वात उजव्या बाजूला 'टूल्स'वर जा. त्यातील 'सिक्युरिटी ऑप्शन्स'वर क्लिक करा. वरतीच 'पासवर्ड टू ओपन'च्या पुढे तुमचा पासवर्ड टाइप करा. फाइल कोणी बदलू नये असे वाटत असेल तर 'पासवर्ड टू मॉडीफाय'च्या पुढे वेगळा पासवर्ड द्या. ओके म्हणून क्लोज करा. आता तुम्हाला ती फाइल ओपन करताना प्रत्येक वेळेस तो पासवर्ड द्यावा लागेल. हा तुम्हाला त्रास वाटेल, पण त्याला पर्याय नाही. 'पासवर्ड टू मॉडीफाय'वर तुम्ही पासवर्ड दिला असेल तर तोही पासवर्ड द्यावा लागेल. नाहीतर तुम्हालाही काही बदल करता येणार नाहीत.

(टीप : या सर्व सूचना वर्ड २००३साठी लागू आहेत.)

चॅटिंगसाठी खुश्कीचे मार्ग!

चॅटिंग करणं, फाइल सेव्ह करणं किंवा डिलिट करणं ही कामसुद्धा सहज-सोपी करता येतात. शिवाय संभाव्य धोकेसुद्धा टाळता येतात. हे सारे करायचे कसे याचा घेतलेला वेध...
.
सध्या इंटरनेटवर काम करताना चॅटिंगवर जास्त भर दिला जातो. माहितीच्या या महाजालातूत माहिती मिळविण्याऐवजी मित्रमैत्रिणीशी जीटॉक अथवा याहू मेसंेजर अथवा एमएसएन मेसेजरवरून गप्पा मारण्यात अनेकांचा वेळ जातो. हा इंटरनेटचा दुरुपयोग आहे असे म्हटले तर काहीजणांना राग येईल. पुढेमागे 'इंटरनेट : शाप की वरदान' असा विषय निबंधासाठी शाळेत आला तर आशर्य वाटायला नको. असो.

हे चॅटिंग स्वत:च्या मालकीच्या कम्प्युटरवरून होते आहे तोपर्यंत फारसा धोका नाही. परंतु, दुसऱ्याच्या मशीनवरून करत असाल तर तुमचे संभाषण अथवा मेल पासवर्ड तिथे सेव्ह होण्याची शक्यता असते. यासाठी एक काम करा. 'मीबो डॉट कॉम'वर जा. कोणताही ब्राऊझर ओपन करा आणि 'मीबो डॉट कॉम' टाइप करा. याहू, गूगल टॉक, मायस्पेस आणि एमएसएन असे चारही मेसेंजर एकदम दिसतील. तुमचे अकाऊंट जिथे आहे तिथे लॉगऑन करा आणि चॅटिंग करा. तुम्ही एकदा का ब्राऊझर क्लोज केलात की आधीचे सर्व रेकॉर्ड निघून जाईल. मग आपल्या मागावर कोणी आहे का याची काळजी करण्याचे कारण नाही.

आपण काम करताना अनेक फाइल्स सेव्ह करत असतो. बऱ्याच काळानंतर त्या फाइल्स आपल्याला नकोशा होतात किंवा त्यांची खरोखरच आवश्यकता नसते. अशा वेळी त्या आपण डिलिट करायला जातो. परंतु असा मेसेज येतो की 'यू कॅन नॉट डिलिट धिस फाइल बिकॉज इट इज इन यूज'. आपण चक्रावतो. कारण आपण ती फाइल वापरत नाही, तरी ती वापरात आहे असे कम्प्युटर साांगतो. अशा वेळी कंट्रोल ऑल्ट डिलिट एकदम दाबून विंडोज टास्क मॅनेजर ओपन करा. ती विशिष्ट फाइल वापरात आहे का ते बघा. कारण तुमच्या नकळत बॅकग्राऊंडला शेकडो फाइल्स कार्यरत असतातच. विंडोजच्या अशा फाइल्स चालू राहणे अपरिहार्यच असते. टास्क मॅनेजर ओपन झाला तर प्रोसेसेसवर क्लिक करून कायकाय चालू आहे ते पाहा. तुम्हाला नको असणारी फाइल क्लिक करून 'एंड प्रोसेस' असे म्हणा. टास्क मॅनेजर बंद करा आणि मग तुम्हाला जी फाइल डिलिट करायची आहे ती डिलिट करा. एवढे करूनही ती डिलिट होत नसेल तर मशीन रिस्टार्ट करून पाहा. या संदर्भात 'अनलॉकर' नावाचा चकटफु प्रोग्राम डाऊनलोड करता येतो. हा प्रोग्राम तुम्हाला हवी असलेली फाइल रिलिज करतो. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. टास्क मॅनेजरमधील कोणती प्रोसेस थांबवायची याची पक्की माहिती असल्याशिवाय ती थांबवायच्या भानगडीत पडू नका. अन्यथा विंडोज सिस्टिम बिघडण्याची शक्यता असते.

आपण एखाद्या ब्राऊझरमध्ये काम करत असताना तो अचानक स्लो चालायला लागतो आणि मग 'काल तर बरा होता', असे म्हणण्याची पाळी येते. यातले गुन्हेगार हे ब्राऊझरमधले अॅडऑन्स आहेत. हे अॅडऑन्स पी असले तरी ब्राऊझरचे वजन वाढवतात. एखाद्या वाहनात जिथे पाच माणसे बसू शकतात तिथे भरपूर वजनाची दहा माणसे बसविली की अनावश्यक वजनामुळे गाडी स्पीड घेत नाही. तसेच ब्राऊझरचे आहे. म्हणून अनावश्यक अॅडऑन्स डिलिट करणे आवश्यक आहे. तुम्ही आयई वापरत असाल तर एक काम करा. टूल्सवर क्लिक करून मॅनेज अॅडऑन्स आणि मग एनेबल ऑर डिसेबल अॅडऑन्सवर जा. तुमच्या ब्राऊझरमध्ये कोणकोणते प्लगइन्स वा इतर प्रोग्राम डाऊनलोड झाले आहेत ते पाहा. अनावश्यक प्रोग्राम डिसएबल करा. ते डिलिट करण्याची गरज नाही. मोजके आवश्यक अॅडऑन्स ठेवले तर ब्राऊझर पुन्हा वेगाने काम करायला लागेल.

नव्या साइट्स!

इंटरनेटचा पसारा खूपच मोठा आहे. त्यामुळेच चांगल्या साइट्स आहेत तरी कोणत्या असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्याची आणि इतरही प्रश्नांची केलेली उकल...
......

इंटरनेटवर गेल्यावर आपल्याला काय शोधू आणि काय नाही असे झालेले असते. सगळ्याच चांगल्या साइट्स आपल्याला माहीत असतील असे नाही. कारण इंटरनेटचा पसारा इतका मोठा आहे की त्यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळणे केवळ अशक्य आहे. तरीही तुमच्या इंटरेस्टच्या चांगल्या साइट्स कोणत्या हे जाणून घ्यायची इच्छा असली तर? त्यासाठी www.stumbleupon.com ही साइट तयार आहे. या साइटवर गेल्यावर शेकडो माहितीपूर्ण साइट्सचा खजिना मिळेल. ती साइट ओपन केल्यावर 'साइन अप हिअर' या बटनावर क्लिक करा, पुढे विचारण्यात येणारी आवश्यक ती (ईमेल, पासवर्ड वगैरे) माहिती भरा. तुम्हाला कोणत्या विषयात रस आहे ते निवडा की मोठा खजिना तुमच्यापुढे खुला झालाच म्हणून समजा. 'आयई ८' वापरत असलात तरी स्टम्बलअपॉनचा टूलबार लोड करता येईल. ते झाले की इंटरनेट सफिर्ंगची मजा वाढेल आणि आपण फार मर्यादित स्वरूपात इंटरनेटचा वापर करत होतो हे लक्षात येईल.

अधिकृत विंडोज - या नेटभेट सदरावर बऱ्याच वाचकांच्या प्रतिक्रिया येत असतात. प्रफुल्ल सबनीस यांनी असे विचारले आहे की, मशीन सुरू केल्यावर डी आणि एफ ड्राइव्हमधल्या फाइल्स चेक करा असा मेसेज येत राहातो. तशा त्या चेक केल्यावरही प्रत्येक वेळेस मेसेज येतोच. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या दुसऱ्या प्रश्नात आहे. त्यांनी मशीनमध्ये लोड केलेली विंडोज सिस्टिम अधिकृत नाही, पायरेटेड आहे असा मेसेजही त्यांना येतो. (धिस कॉपी ऑफ विंडोज डिड नॉट पास जेन्युइन विंडोज व्हॅलिडेशन). विंडोज अधिकृत नसल्यावर तो क्रॅश होण्याचा संभव असतो. म्हणून कधीही पायरेटेड विंडोज बसवून घेऊ नये. तसे केल्यास व्हायरसना आपणच मशीनमध्ये येण्यास आमंत्रण देतो. सिक्युरिटी अपडेट्स मिळत नाहीत आणि मशीन खेळण्यातले मशीन होऊन जाते. त्यांचा तिसरा प्रश्नही याच्याशीच निगडित आहे. मशीन फास्ट कसे चालेल? मशीन फास्ट चालण्याचा सोपा मार्ग म्हणजे डिफ्रॅगमेंटेशन करणे (डेस्कटॉपवरच्या 'माय कम्प्युटर'वर डबल क्लिक. नंतर सी ड्राइव्हवर राइट क्लिक करून प्रॉपटीर्जवर जा, नंतर टूल्स आणि मग डिफ्रॅगमेंटेशन ) आणि नको असलेल्या फाइल cleaner ची मदत घेऊन काढून टाकणे. याचा ज्येन्युइन अथवा पायरेटेड विंडोजशी संबंध नाही. महिन्यातून एकदा तरी सर्वांनीच ही प्रक्रिया केली पाहिजे.

आल्टरनेटिव्हटू - मागच्या लेखात मी आल्टरनेटिव्हटू या साइटबद्दल लिहिले होते. बऱ्याच वाचकांनी ही साइट मिळत नसल्याची तक्रार केली होती. बहुतेकांनी नुसते आल्टरनेटिव्ह डॉट नेट असे टाइप केल्याने ही चूक होत होती. ती आल्टरनेटिव्हटू डॉट नेट अशी साइट आहे.

डिबगिंग म्हणजे काय? - अनिल नेरकर यांनी विचारले आहे की त्यांना 'रनटाइम एरर हॅज ऑकर्ड, डू यू विश टू ओपन डिबग' अशा आशयाचा मेसेज येतो. डिबगिंग म्हणजे एखाद्या कम्प्युटर प्रोग्राम अथवा इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरमध्ये काही दोष असतील तर ते दूर करण्याची प्रक्रिया. असा मेसेज आला आणि डिबगिंगला 'यस' म्हटले तरी काही बिघडणार नाही. उलट दोष दूर व्हायला मदतच होईल.

डिस्क फॉरमॅट - शरद कंटक यांनी एखादी डिस्क फॉरमॅट केल्यावर त्यावर आधी सेव्ह केलेला डाटा पुन्हा मिळू शकतो का असे विचारले आहे. याचे उत्तर 'नाही' असेच आहे. एकदा डिस्क फॉरमॅट केली की त्यावरचा डाटा मिळवणे अशक्य असते. म्हणूनच डिस्क फॉरमॅट करण्याआधी त्यावरचा आवश्यक डाटा दुसरीकडे सेव्ह करणे गरजेचे असते. मात्र समजा तुमचा कम्प्युटर क्रॅश झाला म्हणजेच तुमची एखादी डिस्क उडाली तर त्यावरचा डाटा काही प्रमाणात रिकव्हर करणे शक्य असते.

बुकमार्क आणि डबलकिलर

वेगवेगळे बुकमार्क नव्या ब्राऊझरमध्ये कसे आणायचे, फाईल्स सेव्ह करताना काय काळजी घ्यायची, विनामूल्य सॉफ्टवेअर, परदेशांतील वेळ आदी गोष्टी कशा मिळवायच्या याचा सोदाहरण घेतलेला वेध...
....

इंटरनेट एक्स्प्लोरर (आयई)ऐवजी फायरफॉक्स वापरा असे मी अनेक वेळा सांगितले आहे. पण असा ब्राऊझर बदलताना आधीच्या ब्राऊझरमध्ये कष्टाने जमविलेले बुकमार्क नव्या ब्राऊझरमध्ये कसे आणायचे? एकेक आणत बसायचे तर ते खूप वेळखाऊ असते. त्यापेक्षा ही सोपी पद्धत अवलंबायला हरकत नाही. समजा तुम्ही आयई वापरता आहात आणि त्यातले बुकमार्क तुम्हाला फायरफॉक्समध्ये ट्रान्स्फर करायचे आहेत. आयई उघडा. 'फाईल'मध्ये जाऊन एक्स्पोर्टवर क्लिक करा, नंतरच्या बॉक्समध्ये फेवरिट्सवर क्लिक करा व पुढे जा. ती एचटीएम फाइल कुठे सेव्ह करायची ते ठरवा. समजा डेस्कटॉप. ओके म्हणा व आयई बंद करा. फायरफॉक्स उघडा. फाईल इम्पोर्ट म्हणा. डेस्कटॉपवरील फाइल निवडा व ओके म्हणा. क्षणार्धात सारे बुकमार्क तुमच्या सेवेला हजर.

आता फायरफॉक्सचे ३.५ व्हर्जन उपलब्ध आहे. त्यात तर हेही करावे लागत नाही. फाईलवर क्लिक केल्यावर इम्पोर्ट म्हणा. कोणत्या ब्राऊझरमधून इम्पोर्ट करायचे आहे ते ठरवा. नंतर पुढच्या बॉक्सवर जाऊन कायकाय इम्पोर्ट करायचे आहे ते ठरवा. ओके म्हणा की झाले सारे इम्पोर्ट. जवळपास सर्वच ब्राऊजर नव्याने डाऊनलोड करताना बुकमार्क आपोआप ट्रान्स्फर करण्याची सोय देतातच. त्यामुळे काळजीचे कारण नाही.

****
आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फाइल ओपन करतो व बंद करतो. एकाच ठिकाणी एकाच नावाच्या दोन फाइल्स सेव्ह करता येत नाहीत हे उघडच आहे. म्हणून आपण त्याच प्रकारच्या फाइल्स वेगवेगळ्या प्रकारात सेव्ह करतो. पण नंतर कधी सर्च दिला तर आपण एकाच नावाच्या फाइल का सेव्ह केल्या आहेत असा प्रश्न पडतो. कधीकधी आपण बॅकअपच्या हेतूने या फाइल्स वेगवेगळ्या ड्राइव्हमध्ये सेव्ह केलेल्या असतात. अशा फाइल्सची संख्या वाढली की फोल्डरसाइझ वाढतो व मशीन स्लो होते. फाइलचे नाव सारखे असल्याने अशा वेळी कोणती फाइल डिलिट करावी आणि कोणती ठेवावी हे कळत नाही. अशा वेळेस 'डबलकिलर' हे अॅप्लिकेशन उपयोगी पडते. ते डाऊनलोड करून घ्या. रन केल्यावर एकाच फाइलनेमच्या किती फाइल मशीनमध्ये आहेत, त्याचा साइझ, तारीख काय आहे हा सारा तपशील तुमच्या समोर येईल. मग नको असलेल्या फाइल्स डिलीट करा. मात्र ते करताना काळजी घ्या. कारण एखादी लेटेस्ट फाइल डिलिट होईल आणि आधीची अनकरेक्टेड राहील.

मी या कॉलममधून अनेक सॉफ्टवेअरचा उल्लेख करतो. परंतु, सगळी सॉफ्टवेअर चकटफु नसतात. मग त्या सॉफ्टवेअरला पर्यायी असे चकटफु पण परिणामकारक सॉफ्टवेअर उपलब्ध आहे का असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडू शकेल. त्यासाठी 'आल्टरनेटिव्हटू' ही साइट तुमच्या सेवेला हजर आहे. 'आल्टरनेटिव्हटू डॉट नेट' टाइप करून या साइटवर जा. विविध सॉफ्टवेअरचा खजिनाच तुम्हाला दिसेल. प्रत्येक महागड्या सॉफ्टवेअरला पर्याय काय ते तुम्हाला दिसेल. कुठले सॉफ्टवेअर डाऊनलोड करू आणि कुठले नको असे तुम्हाला होईल. प्रत्येक सॉफ्टवेअरचा तपशील दिलेला आहे. त्याप्रमाणे व तुमच्या मशीनच्या कुवतीनुसार कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या.

तुम्ही इंगजीतून काही टाइप करत आहात. सगळे शब्द स्मॉल कॅप्समध्ये टाइप केल्यावर तुमच्या लक्षात आले की पहिले अक्षर कॅपिटल हवे. मग काय कराल? तो शब्द सिलेक्ट करा आणि शिफ्ट व एफ ३ ही बटन्स एकदम दाबा.

सध्या युएसओपन टेनिस स्पर्धा चालू आहे. त्याचे सामने कोणत्या वेळेला चालू आहेत हे जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो. पण आपल्याकडे किती वाजले की तिकडे सामने सुरू होतात हे समजून घ्यायचे असेल तर तिकडची वेळ माहीत असायला हवी. त्यासाठी 'टाइमअँडडेट डॉट कॉम' या साइटवर जा. तिथे रजिस्टर करणे बंधनकारक नाही, पण सेटिंग्ज सेव्ह करायची असतील तर रजिस्टर केलेले बरे! नंतर पर्सनल र्वल्ड क्लॉक, साइट कॉन्फिगरेशनवर क्लिक करा व योग्य ते सेटिंग करा. तुम्हाला हव्या त्या शहराची वेळ तुमच्या समोर येईल.

घरच्या कम्प्युटरवर 'नजर' ठेवा?

तुम्ही ऑफिसला गेल्यावर घरचा कम्प्युटर बंद असतो असा समज करून घेऊ नका. आजकाल वडीलधाऱ्या मंडळींपेक्षा मुलेच जास्त कम्प्युटर वापरतात. त्यांनी त्याचा गैरवापर करू नये म्हणून कम्प्युटर लॉक करून जाणे अथवा त्याला पासवर्ड देणे असे उपाय आपल्याला करता येतात. परंतु, काही वेळा शाळा, कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी अथवा ऑफिसच्या कामासाठी मुलाला खरोखरच कम्प्युटरची गरज असते. तरीही आपले मूल खरोखरच कामासाठी कम्प्युटर वापरते आहे की भलतेच काही पाहण्यासाठी हे तुम्हाला कसे ओळखता येईल? मुलांनी आपल्या गैरहजेरीत कम्प्युटर किती वेळ वापरला हे कसे ओळखाल? ते ओळखता येईल. अगदी सोप्या पद्धतीने. तेही कोणतेही नवे सॉफ्टवेअर डाऊनलोड न करता!

कम्प्युटरच्या 'स्टार्ट' बटनावर क्लिक करा. कंट्रोल पॅनेलवर जा. तिथून 'अॅडमिनिस्ट्रेटिव्ह टूल्स'वर जा. त्यावर डबल क्लिक केल्यावर काही ऑप्शन्स दिसतील. त्यातल्या 'इव्हेंट व्ह्युअर'वर क्लिक करा. एक बॉक्स उघडेल. त्यातल्या डाव्या भागात 'इव्हेंट व्ह्युअर (लोकल)' असे लिहिलेल्या भागातील 'सिस्टिम'वर क्लिक करा. उजवीकडे टाइम, डेट, सोर्स, कॅटेगरी, इव्हेंट वगैरे कॉलम दिसतील. परंतु त्याने घाबरून जाऊ नका. यातली इव्हेंट कॅटेगरी महत्त्वाची आहे. या कॅटेगरीखाली वेगवेगळे आकडे दिसतील. त्यातला ६००५ हा आकडा तारखेच्या कॉलमातील तारखेला कम्प्युटर सुरू करण्याची वेळ दर्शविते तर ६००६ आकडा कम्प्युटर बंद केल्याची वेळ सांगते. इतर सर्व आकडे जाऊन फक्त कम्प्युटर सुरू आणि बंद केल्याच्याच वेळा हव्या असल्या तर? तर वरती फाइल, अॅक्शन, व्ह्यू, हेल्प या ऑप्शनपैकी व्ह्यूवर क्लिक करा. मग 'फिल्टर'वर जा. एक बॉक्स ओपन होईल. यातल्या फिल्टरमध्ये इव्हेंट आयडीच्या पुढे ६००५ किंवा ६००६ आकडे टाइप करा व ओके म्हणा. आता फक्त कम्प्युटर सुरू वा बंद केल्याच्या वेळा तुम्हाला दिसतील. मग तुमच्या गैरहजेरीत घरच्यांनी किती वेळ कम्प्युटर वापरला ते लगेचच कळेल. मुलांवर अविश्वास दाखवा असे मला सुचवायचे नाही, पण आपल्या गैरहजेरीत कम्प्युटरचा वापर होतो का हे तपासणे महत्त्वाचे आहे.

एवढे करायचे नसेल तर कम्प्युटरला स्वत:चा पासवर्ड देऊ शकताच. त्यासाठी कंट्रोल पॅनेल - यूजर अकाऊंट्स - तुमचे अकाऊंट व नंतर क्रिएट पासवर्ड या मार्गाने जाऊन पासवर्ड देऊ शकता. पण तो विसरलात तर तो रिकव्हर करण्यासाठी एखाद्या तज्ज्ञालाच बोलवावे लागेल.

काही टिप्स
आपण एखादी फाइल रिसायकल बिनमधूनही डिलीट करतो. पण क्षणार्धातच आपल्या लक्षात येते की आपण ही फाईल चुकून काढून टाकली. अशा डिलीटेड फाइल्स कम्प्युटरमध्येच असतात. पण त्या अदृष्य स्वरूपात. त्या कशा रिकव्हर कराल? साधे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. रेकुव्हा (recuva) नावाचे हे सॉफ्टवेअर चकटफु आहे आणि त्याचा साइझ आहे फक्त २.२ एमबी. तो डाऊनलोड झाला की त्यावर डबलक्लिक करा व फाइल रन करा. हार्ड डिस्क आणि मेमरी कार्डमधील सर्व फाइल्स स्कॅन होतील आणि सर्व डिलिटेड फाइल्स तुमच्या समोर येतील. त्यातली हवी ती फाइल तुम्ही 'रिस्टोअर' करू शकता.

रंगीबेरंगी मेल
तुम्ही मैत्रिणीला मेल पाठवताना तो अधिक रोमँटिक करून पाठवू शकता. ईमेलमध्ये वेगवेगळी चित्रे इन्सर्ट करू शकता आणि अॅनिमेशनचा वापरही करू शकता. त्यासाठी डाऊनलोड करा इनक्रेडिमेल (incredimail) हा प्रोग्राम. हाही चकटफु आहे आणि त्याचा साइझ आहे फक्त ५८४ केबी.

मेलवॉशर!
कम्प्युटरमध्ये व्हायरस वा स्पॅममेल येऊ नये म्हणून तुम्ही कितीही काळजी घेतलीत तरीही हा प्रकार पाहुणा म्हणून येतोच आणि त्यातले काही पाहुणे अगदी चिवट असतात. या स्पॅम मेल येऊच नयेत म्हणून काय कराल? त्यासाठी मेलवॉशर (mailwasher.net) उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करा व ऑटोमॅटिक बटनवर क्लिक करा. तुमच्या मशीनमध्ये जे ईमेल सॉफ्टवेअर असेल (उदा. आऊटलूक एक्स्प्रेस) त्याची सेटिंग्ज तुम्हाला उजव्या बाजूला दिसतील. ज्या ईमेल प्रोग्रामच्या एंट्रीच्या पुढे अॅप्लिकेशन असे लिहिलेले असेल तेथे टिक करा व फिनिश म्हणा. नंतर आऊटलूक एक्स्प्रेस जेव्हा जेव्हा उघडेल, तेव्हा चेक मेल म्हटल्यावर प्रत्येक मेल चेक होऊन येईल. जी स्पॅममेल असेल ती दाखविली जाईल. ती न उघडता त्यावर राइटक्लिक करून 'अॅड टू ब्लॉकलिस्ट ' असे म्हणू शकता.

...तर काय कराल?

कम्प्युटर स्लो होण्याची अनेक कारणे असतात. त्यातलेच एक म्हणजे 'स्लायडिंग विंडोज अथवा मेन्यू'चे ऑप्शन ऑन असणे हे होय. अॅनिमेशन इफेक्ट ऑन असला अथवा फेड इफेक्ट असला तरी कम्प्युटर हळू चालतो. ती ऑप्शन्स काढून टाकण्यासाठी काय कराल?
.......

काही वेळा कम्प्युटरची काही सेटिंग्ज कटकटीची वाटतात. उदा. एखादी फाइल डिलीट करायची असेल तर ती डिलीट झाल्यावर पुन्हा 'तुमची फाइल डिलीट झाली आहे,' असा संदेश कशाला वाचायचा? ती फाइल नाहीशी झाली हे तुम्हाला कळतेच. हा संदेश वाचायचा नसेल तर एक काम करा. डेस्कटॉपवरच्या 'रिसायकल बिन'वर राइट क्लिक करा. नंतर प्रॉपटीर्जवर क्लिक करा. यात खाली 'डिस्प्ले डिलीट कन्फमेर्शन डायलॉग'च्या बाजूला क्लिक असेल तर ती काढून टाका. आता पुन्हा हा संदेश दिसणार नाही. याच बॉक्समध्ये 'डू नॉट मूव्ह फाइल्स टू रिसायकल बिन' यावर मात्र क्लिक करू नका. अन्यथा डिलीट केलेल्या फाइल्स थेट नाहीशा होतील. 'यूज वन सेटिंग्ज फॉर ऑल ड्राइव्हज' यावर आवर्जून क्लिक हवी. म्हणजे प्रत्येक हार्ड ड्राइव्हसाठी वेगवेगळे सेटिंग करायची गरज भासणार नाही.

* * *

कम्प्युटर स्लो होण्याची अनेक कारणे असतात. त्यातलेच एक म्हणजे 'स्लायडिंग विंडोज अथवा मेन्यू'चे ऑप्शन ऑन असणे हे होय. अॅनिमेशन इफेक्ट ऑन असला अथवा फेड इफेक्ट असला तरी कम्प्युटर हळू चालतो. ती ऑप्शन्स काढून टाकण्यासाठी काय कराल? डेस्कटॉपवरच्या 'माय कम्प्युटर'वर राइट क्लिक करा. प्रॉपटीर्जवर जा पुढे अॅडव्हान्स्ड टॅबमध्ये सेटिंग्जमध्ये जा. अॅनिमेशन, स्लाइड अथवा फेड असे ऑप्शन असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरची क्लिक काढून टाका. अप्लाय म्हणा व ओके म्हणून बॉक्स बंद करा. लगेच दृश्य स्वरूपातला फरक कळला नाही तरी नंतर फरक जाणवेल.

तुम्हाला वेब ब्राऊझरमध्ये एखादा पत्ता टाइप करायचाय, पण प्रत्येक पत्त्यामागे http://www. टाइप करायचा कंटाळा आहे? हरकत नाही. कम्प्युटर माणसाला आळशी बनवायला मदतच करत असतो. तुम्हाला महाराष्ट्रटाइम्स डॉट काम ही साइट ओपन करायचीय? मग नुसते महाराष्ट्रटाइम्स असे टाइप करा व कंट्रोल एंटर ही बटन्स दाबा. आपोआप पूर्ण पत्ता तिथे टाइप होईल. याच आणखी एक फायदा असा की तुम्हाला वेबसाइटचा पत्ता माहीत नसला तरी तो आपोआप तेथे येतो. उदा. तुम्ही महाराष्ट्र टाइम्स टाइप केल्यावर http://maharashtratimes.indiatimes.com/ असे येते व तुम्ही लगेचच म.टा.च्या साइटवर जाता.

तुम्ही कम्प्युटरवर काम करताना प्लग इन हा शब्द बऱ्याच वेळा पाहिला असेल. एखाद्या मोठ्या सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे छोटे पण अत्यंत उपयोगी सॉफ्टवेअर म्हणजे ही प्लग इन्स. तुम्हाला वेबवर एखादा व्हीडिओ पाहायचा असेल तर अनेक वेळा 'प्लग इन नॉट डाऊनलोडेड' असा संदेश येतो व व्हीडिओ पाहता येत नाही. फायरफॉक्स, फोटोशॉप किंवा असंख्य ऑडिओ प्रोग्राम्समध्ये अशा प्लगइनची गरज भासते. ते गरजेनुसारच डाऊनलोड करा. अन्यथा कम्प्युटर स्लो होतो अथवा ते विशिष्ट सॉफ्टवेअर स्लो ओपन होते. एखादा प्रोग्राम तुम्हाला जेव्हा विचारतो की अमुक एक प्लगइन डाऊनलोड करणे गरजेचे आहे, तेव्हा ते डाऊनलोड करायचे असते. आधीपासून आपल्याला एखादे प्लगइन नाही असे सांगणे कठीण असते.

तुम्ही स्टार्ट मेन्यूवर क्लिक केलेत की बऱ्याच वेळेला प्रोग्रामची गदीर् दिसते. ते सगळे मशीन्समधील प्रोग्रामचे शॉर्टकट असतात. यातले जे शॉर्टकट नको असतात ते तुम्ही डिलीट करू शकता. 'स्टार्ट'वर क्लिक करा आणि जो शॉर्टकट डिलीट करायचा आहे त्यावर राइट क्लिक करा आणि डिलीट म्हणा. तो शॉर्टकट निघून जाईल, प्रोग्राम नाही. पुन्हा तो तुम्हाला स्टार्ट मेन्यूमध्ये हवा असेल तर तोही आणता येईल. त्यासाठी 'पिन टू स्टार्ट मेन्यू' असे म्हणा.

तुम्ही ऑफिसमध्ये कम्प्युटरवर काम करताना मध्येच उठून साहेबांकडे किंवा अगदीच कॉफीची तल्लफ आली तर कॉफी प्यायला उठून जावे लागले तर? मशीनला कोणी हात लावू नये अशी तुमची स्वाभाविक अपेक्षा असणार. कोणी काही गडबड करू नये म्हणून एक काम करा. कीबोर्डवरची विंडोजची की दाबून लगेच 'एल'चे बटन दाबा की झाला कम्प्युटर लॉक. तुम्ही परत जाग्यावर आलात की कंट्रोल आल्टर डिलिट ही तीनही बटन्स एकदम दाबा, तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल (जो आधी सेट केलेला पासवर्ड असेल) तो दिल्यावरच कम्प्युटर तुम्हाला वापरता येईल. मात्र हे सेटिंग ऑफिसमधल्या एखाद्या तज्ज्ञाला विचारून केलेले बरे. अन्यथा कम्प्युटर रूसूनच बसायचा !

नवे होमपेज आणि शॉर्टकट!

मायक्रोसॉफ्टने नुकतेच त्यांचे 'बिंग' हे सर्च इंजिन वाजतगाजत बाजारात आणले आणि याहूनेही त्यांचे सर्च इंजिन सुधारले. आता दोघांच्या एकत्र येण्याने काय फरक पडतो ते पाहावे लागेल. तूर्त तरी त्यांचे सहजीवन दहा वर्षांपुरतेच ठरले आहे.

अखेर मायक्रोसॉफ्ट आणि याहू यांचे मीलन झालेच. गुगलला लढत देण्यासाठी दोघांनाही एकत्र येणे आवश्यक होतेच. कारण दोघांकडेही एकट्याने गूगलशी लढण्याची ताकद नव्हती. आता दोघेही सर्च इंजिनसाठी एकत्र आले आहेत. मायक्रोसॉफ्टने नुकतेच त्यांचे 'बिंग' हे सर्च इंजिन वाजतगाजत बाजारात आणले आणि याहूनेही त्यांचे सर्च इंजिन सुधारले. आता दोघांच्या एकत्र येण्याने काय फरक पडतो ते पाहावे लागेल. तूर्त तरी त्यांचे सहजीवन दहा वर्षांपुरतेच ठरले आहे. या काळात गूगलवर मात करण्यासाठी ते जे काही करतील ते तुमच्या माझ्यासाठी लाभदायी असेल यात शंका नाही.

याहू स्वत:चे नवीन होमपेज तयार करत आहे. ते मला तरी आवडले. www.yahoo.co.in/trynew असे ब्राऊझरमध्ये टाइप करा आणि एंटरचे बटन दाबा. या साइटची शक्ती डाव्या बाजूच्या उभ्या कॉलममध्ये आहे. एकाच साइटवर अनेक साइट पाहता येतात हे याचे वैशिष्ट्य आहे. त्यात 'माय फेवरिट्स' या हेडखाली अनेक साइट दिसतील. त्यातल्या काही नको असल्या तर त्या तुम्ही काढून टाकू शकता वा वरच्या 'अॅड' बटनावर क्लिक करून तुमच्या आवडत्या साइट अॅडही करू शकता. (मात्र त्यासाठी तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या 'लॉगिन' बटनावर क्लिक करावे लागेल. तुमचा याहूचा ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. नसला तर दोन मिनिटांत शेजारच्याच बटनावर क्लिक करून तो तयार करू शकता). आपण एखाद्या साइटचा बुकमार्क करतो तसाच हा प्रकार आहे. पण यात 'प्रीव्ह्यू'ची सोय असल्याने तुम्ही त्या साइटच्या नावावर माऊसचा कर्सर नेल्याबरोबर ती साइट ओपन होते. महत्त्वाच्या बातम्या अथवा त्या साइटवर जे काही असेल ते दिसते. त्यातील काही वाचायचे असेल तरच क्लिक करा अथवा कर्सर दुसऱ्या साइटवर न्या. या डाव्या कॉलमच्या शेजारी पानाच्या मध्यभागी 'याहू न्यूज' आहेत. त्या बातम्याही ताज्या असतील याची खबरदारी घेतली गेली आहे.

मी मागच्या एका लेखात 'वर्ड फाइलमध्ये तुम्ही फोटो टाकू शकता' असे म्हटले होते. पण तसे फोटो टाकल्याने फाइलची साइझ मोठी होते आणि मग ती फाइल लोड व्हायला वेळही लागतो. तुम्ही वर्ड २००३ वापरत असाल तर एक सोपी युक्ती करता येईल. वर्ड ओपन करून 'टूल्स - ऑप्शन्स'मध्ये जा. नंतर 'व्ह्यू'मध्ये जा. तिथे 'यूज द पिक्चर प्लेसहोल्डर्स'चा बॉक्स चेक करा. ओके म्हणून बंद करा. आता तुम्ही जेव्हा वर्डमध्ये पिक्चर टाकाल, तेव्हा त्या फोटोच्या आकाराची चौकोनी बॉर्डर फक्त दिसेल. फोटो दिसणार नाही व फाइलही हेवी होणार नाही. मग सगळे फोटो प्लेस केल्यावर ते योग्य आहेत की नाही ते कसे कळेल? मग 'फाइल प्रिंट प्रीव्ह्यू'मध्ये जा, सगळे फोटो नीट दिसतील. त्याचा प्रिंटही व्यवस्थित येईल.

तुम्ही वर्ड २००३ अथवा २००७मध्ये काम करत असलात तर एक गंमत करून पाहा. समजा तुम्ही काही फाइल्स तयार करत आहात. त्यातल्या काही फाइल्समध्ये काही मजकूर आहे व काही वेगळा आहे. समान मजकूर असला तर तो तुम्हाला परत परत टाइप करायला लागतो किंवा जुनी फाइल ओपन करून तो मजकूर कॉपी करायचा व नव्या फाइलमध्ये पेस्ट करायचा. यात घाईत नवीन फाइल चुकून क्लोज झाली तर? तीही सेव्ह न करता? तुम्हाला जो परिच्छेद अथवा ओळी परत परत लागणार आहेत तेवढ्याच सिलेक्ट करा. तुमची वर्डची विंडो लहान करा. डेस्कटॉप दिसण्याएवढीच. तो सिलेक्ट केलेला मजकूर 'पकडून' डेस्कटॉपवर नेऊन ठेवा. मात्र हे करण्यासाठी वर्डमधली 'ड्रॅग अँड ड्रॉप' ऑप्शन ऑन केलेले असले पाहिजे. (वर्ड २००३मध्ये टूल्स - ऑप्शन्स - एडिट - ड्रॅग अँड ड्रॉप या मार्गाने जा) हा बाहेर आणलेला मजकूर आपोआप 'डॉक्युमेंट स्क्रॅप' नावाने सेव्ह होतो. त्यातील मजकुराच्या पहिल्या दोन-तीन शब्दांचे नाव त्या फाइलला आपोआप मिळते. मग जेव्हा दुसऱ्या फाइलमध्ये तो मजकूर घ्यावा लागेल तेव्हा डेस्कटॉपवरच्या त्या फाइलवर डबलक्लिक केले की तो ओपन होईल. तो कॉपी करा व हव्या त्या फाइलमध्ये पेस्ट करा. यात सोय एवढीच की प्रत्येक वेळा जुनी फाइल ओपन करून कोणता मजकूर कॉपी करायचा आहे हे शोधावे लागत नाही. ती फाइल डेस्कटॉपवर तयारच असते.

कम्प्युटर माणसाला आळशी बनवतो, तो असा!

'अपडेटेड' सॉफ्टवेअर!

ऑटोमॅटिक मायक्रोसॉफ्ट अपडेटस्' हे ऑप्शन ऑन ठेवले, तरी ते मायक्रोसॉफ्टपुरतेच काम करते. बाकी सॉफ्टवेअर अपडेट झाले आहे हे कसे कळणार? त्याचा वेध...
....

आपण बऱ्याच वेळेला नवनवीन सॉफ्टवेअर डाऊनलोड करत असतो. बऱ्याचजणांना तो छंदच असतो. ते सॉफ्टवेअर आपल्याला खरोखरच आवश्यक आहे का, ते आपल्या मशीनच्या प्रकृतीला मानवणारे आहे का याचा फारसा कोणी विचार करत नाही. जर मशीनला ते झेपणारे नसेल तर तशी स्पष्ट सूचना मिळते. मग ते डाऊनलोड करण्याचा हट्ट सोडायला हवा. सगळे ते 'लेटेस्ट' हवे असणाऱ्यांसाठी नेटवर काही टूल्स उपलब्ध आहेत. तुमच्या मशीनमध्ये कोणते सॉफ्टवेअर अद्ययावत झाले आहे ते या सॉफ्टवेअरमुळे सांगता येते. तुम्ही 'ऑटोमॅटिक मायक्रोसॉफ्ट अपडेटस्' हे ऑप्शन ऑन ठेवले असले तरी ते फक्त मायक्रोसॉफ्टपुरतेच काम करते. बाकी सॉफ्टवेअर अपडेट झाले आहे हे कसे कळणार?

त्यासाठी तुम्ही नेटवर जा. filehippo.com ही साइट ओपन करा. तिथे सध्या 'अपडेट चेकर व्हर्जन १.०३२' उपलब्ध आहे. ती केवळ १५४ केबीची असल्याने घरी ब्रॉडबँड नसणाऱ्यांनाही पटकन डाऊनलोड करता येईल. डेस्कटॉपवर सेव्ह करा आणि नंतर त्यावर डबलक्लिक करून ती 'रन' करा. काही सेकंदांतच तुमच्या मशीनमध्ये कोणते सॉफ्टवेअर आऊटडेटेड झाले आहे त्याची लिस्टच स्क्रीनवर दिसेल. त्यातील कोणते अपडेट्स डाऊनलोड करायचे हे मात्र तुम्हालाच ठरवायला लागेल. Updastar हे आणखी एक असेच सॉफ्टवेअर. ते फाइलहिप्पोपेक्षा अधिक परिणामकारक आहे असे म्हणतात. त्यात मशीनमधले प्रत्येक सॉफ्टवेअर तपासले जाते व त्याचा रिपोर्ट मिळतो. त्याची महागडी व्हर्जन अधिक प्रभावी आहे. फुकटातली व्हर्जन आपल्याला पुरेशी आहे.

फायरफॉक्स या ताज्या दमाच्या ब्राऊझरमध्ये 'सॉफ्टवेअर अपडेट चेकर १.३' अशी सुविधा होती. परंतु, दहा दिवसांपूवीर् फायरफॉक्स व्हर्जन ३.५ उपलब्ध झाल्यानंतर हा प्रोग्राम उपयोगी ठरत नाही. तिथे हा चेकर डाऊनलोड करायला गेल्यावर 'हा प्रोग्राम फायरफॉक्सच्या जुन्या व्हर्जनलाच उपयोगी पडतो', असा मेसेज येतो आणि निराशा होते. फायरफॉक्सचा धडाका पाहता हा चेकर पुन्हा आपल्या मदतीला धावून येईल यात शंका नाही.

sumo म्हणजेच 'सॉफ्टवेअर अपडेट मॉनिटर' हेही चांगले आहे. याचे वैशिष्ट्य असे की नेमकी कोणत्या प्रकारची सॉफ्टवेअर तुम्हाला चेक करायची आहेत तेवढेच चेक करण्याची सुविधा आहे. त्यातून वेळ वाचतो आणि भरमसाठ प्रमाणात सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याचा मोहही वाचतो. याचा फाइलसाइझ दीड एमबी आहे. Securial psi हे सॉफ्टवेअर उपयुक्त असल्याचे शेरेही इंटरनेटवर वाचायला मिळतात. यातील पीएसआय म्हणजे 'पर्सनल सॉफ्टवेअर इन्स्पेक्टर'. नवीन सॉफ्टवेअरबरोबरच तुमचे मशीन सुरक्षित ठेवण्याचेही काम तो करतो, असा दावा त्यांनी केला आहे. appupdater किंवा radarsinc ही आणखी काही सॉफ्टवेअर अपडेटर आहेत. मी ही वापरलेली नाहीत. कारण मला फाइलहिप्पो हे एकच सॉफ्टवेअर पुरेसे वाटते.

सध्या फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर वगैरेच्या माध्यमातून सोशल नेटवकिर्ंग करण्याचे फॅड असल्याचे ओळखून फायरफॉक्सने 'अॅडऑन' म्हणून दहा अशा साइट्सची सोय केली आहे. फायरफॉक्स ओपन केल्यावर टूल्सवर क्लिक करा व नंतर अॅडऑनवर जा. तिथे आवश्यक ते अॅडऑन लोड करून घ्या. अलीकडे कम्प्युटरविषयक बऱ्याच मासिकांच्या साइटवरून नवनवीन सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याची सोय आहे. उदा. download.chip.asia/in या साइटवर हे फायरफॉक्सचे अॅडऑन पटकन मिळतील. त्याचबरोबर अन्य असंख्य सॉफ्टवेअर मिळतील. या काही मासिकांच्या किमती शंभर ते दोनश्ेा रुपयांपर्यंत असतात. ते प्रत्येलाच परवडेल असे नाही. मग अशा वेबसाइट फायदेशीर ठरतात. अन्यथा नुसत्या Download.com या साइटवर जा. CNET.com ही आणखी एक उपयुक्त साइट. तिथे मोबाइल, लॅपटॉपपासून सगळ्या उपकरणांसाठी लागणारी माहिती मिळेल.

प्रत्येक सॉफ्टवेअर अपडेट होत असतेच आणि प्रतिर्स्पध्यासमोर नवनवीन आव्हाने उभी होतात. 'गूगल'ने 'क्रोम ऑपरेटिंग सिस्टिम' आणण्याचा निर्णय घेतला तोही याच कारणाने. मायक्रोसॉफ्टने विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम आणली. त्यानंतर अलीकडेच 'इंटेल'ने स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम आणण्याचा निर्णय घेतला होता. विंडोजमध्ये एक्सपी, व्हिस्ता आणि लवकरच 'विंडोज ७' येत आहे. पण वेगाच्या जमान्यात ग्राहकांना आणखी वेगवान व सुटसुटीत ऑपरेटिंग सिस्टिमची गरज वाटत होती. ती गूगल पूर्ण करील असा विश्वास त्यांना वाटतो आहे. मात्र त्यासाठी वर्षभर वाट पाहायची तयारी हवी. कारण सुरुवातीला ती प्रणाली फक्त 'नोटबुक'मध्येच घालण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या घरच्या पीसीमध्ये ही सिस्टिम बसवता येईल. तोपर्यंत 'वेट अँड वॉच'...

'बिंग'ही डिफॉल्ट होईल?

कम्प्युटरच्या क्षेत्रात आधी मायक्रोसॉफ्टची मक्तेदारी होती. गूगलने तिला धक्का दिल्यावर मायक्रोसॉफ्ट जागे झाले आणि त्यांनी त्यांची सेवा कमालीची सुधारली. विंडोज लाइव्ह अधिक लाइव्ह झाले. याच तंत्राचा वापर करून त्यांनी गूगलला टक्कर देण्यासाठी 'बिंग' नावाचे सर्च इंजिन आणले आहे. बुधवारीच ते अधिकृतपणे लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे...

........

काही महिन्यांपूवीर् विंडोज व्हिस्ता माकेर्टात आल्यावर नावीन्य म्हणून अनेकजणांनी ती सिस्टिम आपल्या मशीनमध्ये लोड करून घेतली. परंतु आधीची विंडोज एक्सपीसारखी सिस्टिम मशीनमधून काढून टाकली नाही. नवी यंत्रणा पटली नाही तर जुनी असावी असा त्यामागचा हेतू असतो. मशीनच्या क्षमतेनुसार एकाच वेळेस दोन सिस्टिम बसवता येतात. पण नंतर मशीन सुरू होताना प्रत्येक वेळेस कोणत्या सिस्टिममध्ये काम करायचे आहे ते विचारले जाते व प्रत्येक वेळा तो ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. तसे करायचे नसेल व उदा. विंडोज एक्सपीमध्येच ते सुरू व्हावे असे वाटत असेल तर? तुमच्या मशीनच्या डेस्कटॉपवरील 'माय कम्प्युटर'वर क्लिक करा. नंतर 'व्ह्यू सिस्टिम इन्फमेर्शन'वर क्लिक करा. नंतर 'अॅडव्हान्स्ड', 'स्टार्टअप अँड रिकव्हरी' अशा क्रमाने जा. सेटिंग्जवर क्लिक केल्यावर 'डिफॉल्ट ऑपरेटिंग सिस्टिम' असे ऑप्शन दिसेल. जी सिस्टिम निवडायची आहे ती निवडा व ओके म्हणून मशीन रिस्टार्ट करा. आता तुम्हाला हव्या त्याच सिस्टिममध्ये मशीन सुरू होईल.

असेच डिफॉल्ट सेटिंग अन्य अनेक बाबतींत करता येते. तुम्ही वर्डमध्ये फाइल तयार करत असाल तर प्रत्येक वेळेस ती कुठे सेव्ह होईल त्याचा विचार तुम्हाला करायला नको. डिफॉल्ट सेटिंग केले की झाले. त्यासाठी वर्ड ओपन करा. टूल्स - ऑप्शन्स - फाइल लोकेशन - डॉक्युमेंट्स मॉडीफाय या मार्गाने जा. मग तुम्हाला कोणत्या फोल्डरमध्ये फाइल कायम सेव्ह करून हवी आहे ते सिलेक्ट करा. ओके म्हणा व वर्ड पुन्हा सुरू करा. यापुढे प्रत्येक फाइल त्याच फोल्डरमध्ये सेव्ह होत राहील. अर्थात एखादी फाइल दुसऱ्या ठिकाणी सेव्ह करायची असेल तर त्या-त्या वेळी तसे करता येईलच. तुमच्या मशीनमध्ये 'वर्ड २००७' बसविले असेल तर मात्र थोड्या वेगळ्या मार्गाने जावे लागेल. वरच्या भागातील वर्डच्या मोठ्या आयकॉनवर क्लिक करा. जो बॉक्स दिसेल त्यात 'वर्ड ऑप्शन्स'वर जा. त्यात 'सेव्ह' ऑप्शनवर जाऊन उजव्या बाजूच्या विंडोतील सेटिंग्ज बदला. माझे वैयक्तिक मत असे की फाईल कुठे सेव्ह करायची हे जेवढे महत्त्वाचे तेवढेच कोणत्या फॉरमॅटमध्ये सेव्ह करायची हेही महत्त्वाचे. ते सेटिंग डॉक फाईलऐवजी आरटीएफ म्हणजे 'रिच टेक्स्ट फॉरमॅट'मध्ये सेव्ह करावे. फाइल आरटीएफ असली की कुठेही कन्व्हर्ट करणे सोपे जाते. आणखी महत्त्वाची बाब अशी की तुम्ही तयार करत असलेली फाइल किती मिनिटांनी आपोआप सेव्ह व्हावी तेही याच विंडोत ठरविता येते. तो वेळ चार मिनिटांपेक्षा जास्त असू नये. म्हणजे काम चालू असताना काही कारणाने मशीन बंद पडले तरी बहुतांश मजकूर सेव्ह झालेला असेल.

कम्प्युटरच्या क्षेत्रात सतत नवनवीन सॉफ्टवेअर येत असते. आधी मायक्रोसॉफ्टची मक्तेदारी होती. गूगलने तिला धक्का दिल्यावर मायक्रोसॉफ्ट जागे झाले आणि त्यांनी त्यांची सेवा कमालीची सुधारली. विंडोज लाइव्ह अधिक लाइव्ह झाले. याच तंत्राचा वापर करून त्यांनी गूगलला टक्कर देण्यासाठी 'बिंग' नावाचे सर्च इंजिन आणले आहे. बुधवारीच ते अधिकृतपणे लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. गूगलचे 'व्यसन' लागलेल्या लोकांनीही ते वापरून पाहावे असे आहे. विशेषत: फोटो शोधण्यासाठी त्यात खूपच सुविधा आहेत. उदा. तुम्ही सचिन तेंडुलकर फोटोज असा सर्च दिला तर सचिनचे फोटो येतीलच, पण बाजूला साइझ (लहान, मध्यम, मोठा, वॉलपेपर), लेआऊट (चौकोनी, आडवा, उंच), कलर (रंगीत, ब्लॅक अँड व्हाइट), स्टाइल (फोटोग्राफ, इलस्ट्रेशन), पीपल (केवळ चेहरा, छातीपर्यंतचा फोटो किंवा बाकीचे फोटो) असे वगीर्करण करता येते. म्हणजेच तुमचा सर्च अधिक नेमका होतो. हाच प्रकार न्यूज आणि इतर प्रकारांतही अनुभवायला मिळतो. प्रत्येक बाबतीत उपऑप्शन्स पाहायला मिळतात आणि वेगळीच गंमत येते.

अर्थात हे 'बिंग' नवीन असल्याने असेल, पण सचिन तेडुलकर असा सर्च दिल्यावर व वर डावीकडे 'वेब'वर क्लिक केल्यावर सचिनबाबत असंख्य ऑप्शन्स देणारे क्ल्यू मिळाले पण त्यातच 'सानिया मिर्झा बाथरूम' हा क्ल्यू मात्र माझी विकेट घेऊन गेला. अशी बिंगं फोडणे या बिंगकडून अपेक्षित नाही. असो, पण एकंदरित हे 'बिंग' सर्च इंजिन स्वत:चा खास प्रभाव पाडेल असे आतातरी वाटत आहे. विंडोज ७ची तारीखही आता जाहीर झाली आहे. ती आहे २२ ऑक्टोबर. त्याच सुमारास गूगलचे 'वेव्ह' हा प्रोग्राम येत आहे. एकंदरित ही वर्षअखेर नेटकरांसाठी सुखावह ठरणार आहे.

फायरफॉक्सची सरशी!

फायरफॉक्स हा ब्राऊझर आतापर्यंत चांगलाच रुळला आहे. इंटरनेट एक्स्प्लोररने आठवी आवृत्ती लोकांपर्यंत पोचवली असली तरी फायरफॉक्स हाच सर्वांचा आवडता ब्राऊझर होत आहे. याचा वापर वाढत असल्याने याचे काही शॉर्टकट्स अथवा युक्त्या देणे क्रमप्राप्त ठरते. त्यातील काही रोजच्या उपयोगाच्या इथे देत आहे.

स्पेसबार हा तसा कीबोर्डवरचा दुर्लक्षित भाग. अशा अर्थाने की टाइप करत असताना दोन शब्दांच्या मध्ये स्पेस सोडण्यासाठीच त्याचा वापर होतो. पण फायरफॉक्स चालू असेल तर हाच बार पेज वरखाली करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. नुसता स्पेसबार मारलात की पेज खाली जाते, शिफ्ट व स्पेसबार एकदम मारल्यास पेज वर जाते.

आपण एखाद्या विषयाचा सर्च दिला आणि ते पेज ओपन झाले की काही वेळा गोंधळून जायला होते. इतका मजकूर असतो की आपल्याला हवा असलेला नेमका भाग कोणता हे कळत नाही. अशा वेळेला कंट्रोल एफ आपल्या मदतीला येते. येणाऱ्या बॉक्समध्ये स्क्रीनवरच्या मजकुरात आपल्याला हवा असलेला एखादा शब्द टाइप केला की लगेच तो शब्द हायलाइट होतो. मग सर्च अधिक नेमका होतो.

तुम्ही वेगवेगळ्या साइट्स पाहत असता, मध्येच एखाद्या साइटचा बुकमार्क करावा असे वाटते. प्रत्येकवेळेला वरच्या भागात जाऊन बुकमार्क धिस पेज असे म्हणून वेळ घालविण्यापेक्षा 'कंट्रोल डी' करा. एक विंडो ओपन होईल. मग त्या साइटचा बुकमार्क करा.

साधारणपणे आपण सर्वजण फायरफॉक्स वापरताना टॅब 'ऑन' केलेले असतात. (नसल्यास टूल्स - ऑप्शन्स - टॅब्जमध्ये जाऊन ऑन करू शकता) तसे केल्याने एकाचवेळेस तुम्ही जास्तीत जास्त साइट्स ऑन ठेवू शकता. एखादी साइट पाहून झाली की न घालवता दुसऱ्या टॅबमधल्या साइट्स पाहू शकता. नवीन टॅब उघडायचा असला तर 'कंट्रोल टी' करा. बरेच टॅब ओपन झाले तर एका टॅबमधून दुसऱ्या टॅबमध्ये जाण्यासाठी 'कंट्रोल टॅब' (साधारणपणे कीबोर्डवरची कॅप्स लॉकवरची की) करा. भराभर वेगवेगळे टॅब पाहता येतील.

इंटरनेट सर्च करायचा असेल तर आपण वरच्या ओळीत असणाऱ्या गूगल अथवा कोणत्यातरी सर्चचा वापर करतो. तिथे जाण्यासाठी 'कंट्रोल के' करा. कर्सर थेट सर्च बॉक्समध्ये जाईल. सर्चबॉक्सऐवजी थे अॅड्रेसबारमध्ये जायचे असले तर? 'कंट्रोल एल' पुरेसे आहे.

तुम्ही एखादी साइट ओपन केलीत, पण त्यावरचा मजकूर फार लहान आकारात दिसत असला तर? 'कंट्रोल व बरोबरीची खूण असलेली की (बॅकस्पेस कीच्या बाजूला) मारली की आकार मोठा होतो. ज्येष्ठ नागरिकांना कम्प्युटरवरचा लहान मजकूर दिसायला, वाचायला त्रास होतो. त्यांना ही साधी युक्ती करता येईल. तेच सूत्र वापरून कंट्रोल व वजाबाकीची खूण असणारी की दाबली की आकार कमी होतो.

एखादा टॅब बंद करायचा असेल तर त्या टॅबवर जाऊन 'कंट्रोल डब्ल्यू' करा. तो लगेच बंद होईल. फायरफॉक्सकडून काही मदत हवी असली तर 'आल्टर एच' करा. हेल्पलाइन समोर येईल. तुम्हाला हव्या त्या लाइनवर क्लिक करुन सर्च करा.

आपण अॅड्रेस बारमध्ये एखादा अॅड्रेस टाइप करतो तेव्हा सुरूवातीला डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू अथवा शेवटी डॉट कॉम असे टाइप करावे लागते. पण फायरफॉक्समध्ये तसे करण्याची गरज नाही. तुम्ही नुसते महाराष्ट्रटाइम्स असे म्हणा व 'कंट्रोल एंटर' मारा. मग डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू आणि डॉट कॉम आपोआप टाइप होईल. मग पुन्हा एंटर मारल्यावर ती साइट समोर येईल. तुमचा पत्ता डॉट नेट असला तर? मग 'शिफ्ट एंटर' मारा. शेवटी डॉट ऑर्ग असले तर 'कंट्रोल शिफ्ट एंटर' मारा.

अशा शॉर्टकटनी काम लवकर होते. फायरफॉक्सच्या अनेक थीम्स आहेत. टूल्स - अॅडऑन्स मध्ये जाऊन त्या लोड करता येतील. तुम्हाला फायरफॉक्सचा स्क्रीन जास्तीत जास्त वापरता यावा यासाठी काय करता येईल? त्यासाठी लिट्लफॉक्स हा अॅडऑन लोड करावा लागेल. त्याने सगळी बटन्स लहान होतात. स्क्रीन मोठा होतो. वेगवेगळी फॅन्सी थीम्स वापरणाऱ्या लोकांना हा लूक अजिबात आवडणार नाही. पण केवळ लूक महत्त्वाचा की व्यवहार्यता हे ज्यानेत्याने ठरवावे.

नेटवरची वंशावळ!

आपली वंशावळ तयार करायची हे तसे किचकट काम आहे. आपल्याला आई-वडील, आजोबा-आजी यांची पूर्ण नावे माहीत असतात. परंतु, त्या आधीच्या पिढीतील लोकांची नावे प्रत्येकाला माहीत असतीलच असे नाही. ती माहिती मिळविलीच तर ती नीट जपून ठेवणे आणखी कष्टाचे असते. अशा वेळेस इंटरनेटवरची एक वेबसाइट कामाला येते.
.....
हल्ली वर्तमानपत्रात आपण वंशावळ, अमुक एका घराण्याचे संमेलन (म्हणजे अभ्यंकर कुलसंमेलन, दामले, रानडे कुलसंमेलन वगैरे) भरणार असल्याच्या बातम्या वाचतो. एकाच आडनावाच्या (परंतु प्रत्येकाचे नाते असेलच असे नाही) मंडळींचेसुद्धा संमेलन होते. ज्यांना नाती जपणे महत्त्वाचे वाटते अथवा ज्यांना अधिक ओळखी करून घ्यायच्या असतात किंवा वाढवायच्या असतात अशी मंडळी आवर्जून अशा संमेलनाला उपस्थित राहतात.

आपली वंशावळ तयार करायची हे तसे किचकट काम आहे. आपल्याला आई-वडील, आजोबा-आजी यांची पूर्ण नावे माहीत असतात. परंतु, त्या आधीच्या पिढीतील लोकांची नावे प्रत्येकाला माहीत असतीलच असे नाही. ती माहिती मिळविलीच तर ती नीट जपून ठेवणे आणखी कष्टाचे असते. अशा वेळेस इंटरनेटवरची एक वेबसाइट कामाला येते. तिचे नाव जेनी डॉट कॉम. (geni.com)

तुमची 'फॅमिली ट्री' म्हणजेच वंशावळ काही मिनिटांत इंटरनेटवर टाकता येते. प्रत्येकाचा ईमेल पत्ता देता येतो, प्रत्येकाचा वाढदिवस देता येतो, प्रत्येकाची माहिती देता येते आणि कुटुंबात एखादा कार्यक्रम असला तर त्याचे निमंत्रणही या साइटवर देता येते. (टपालाने पत्रिका पाठवल्या आणि त्या मिळाल्या नाहीत वगैरे भानगडच नाही). हे करणे अगदी सोपे आहे. इंटरनेट ब्राऊझरमध्ये जेनी.कॉम उघडा. समोर येईल त्या बॉक्समध्ये केवळ तुमचे पहिले नाव आणि आडनाव लिहायचे आहे. ओके म्हणा की झाली वंशावळ लिहिण्याची सुरुवात. मग तुमचे आईवडील, त्यांचे आईवडील, त्यांची मुलेबाळे (म्हणजे तुमच्या आत्या, काका) या सगळ्यांची माहिती तिथे देता येईल. प्रत्येक नावाच्या बाजूला तीन बाण दिसतील. त्यातील प्रत्येकावर क्लिक करून त्या व्यक्तीच्या नातेवाईकांची आणखी माहिती भरता येईल. प्रत्येकाची जन्मतारीख देता येईल.

मुख्य पानावर गेलात की वरच्या बाजूला होम, ट्री, प्रोफाइल, टाइमलाइन, फोटोज आणि व्हीडिओज असे टॅब दिसतील. यातील प्रत्येक टॅब उघडून पाहा. त्यात अनेक सोयी आहेत. वंशावळ कोणत्या फॉर्ममध्ये दिसायला हवी, प्रत्येकाचा फोटो अॅड करायचा असला तर कसा करायचा, एखाद्या कौटुंबिक कार्याचा व्हीडिओ लोड करायचा असला तर तो कसा करायचा याच्या स्पष्ट सूचना यावर पाहायला मिळतील. तुम्ही प्रत्येकाची जन्मतारीख दिलीत आणि टाइमलाइनवर क्लिक केलेत की तुमच्या घराण्यात जन्मलेली पहिली व्यक्ती कोण हे समजेल. (तुमच्या आजोबा-आजीच्या जन्मतारखा माहीत असतील, पण त्या आधीच्या प्रत्येक माणसाच्या जन्मतारखा आणायच्या कुठून? त्यासाठी घरातील ज्येष्ठांची मदत घ्यावी लागेल.) तसेच कॅलेंडरवर क्लिक केलेत की वर्षभरात कोणाचे वाढदिवस कधी येतात ते कळेल. त्याचा एकदा प्रिंटआऊट काढून ठेवला की काम झाले. एखाद्या नव्या कुटुंबीयाची भर पडली तरच साइटवरच्या 'ट्री'मध्ये बदल करावा लागेल. एखाद्याचा मृत्यू झाला तर तसाही बदल करता येईल.

एकदा तुम्ही ही 'ट्री' बनवायला सुरुवात केलीत की प्रत्येकाचे मूळ शोधण्याचा छंदच लागेल आणि सुरुवातीला केवळ स्वत:चे व पत्नी, मुलांचे डिटेल्स देण्यासाठी सुरू केलेली वंशावळ आणखी विस्तारत जाईल. नातेवाईक व मित्रांचे वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी गुगल कॅलेडरचा चांगला उपयोग होऊ शकतो. या कॅलेडरमध्ये सेटिंग केलेत की तुमच्या मोबाइलवर वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मेसेज येतो. मग तुम्ही लगेचच इतरांच्या आधी त्याला शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही इंटरनेटवर जाऊन 'बिल्डिंग फॅमिली ट्री ऑन वेब' असा सर्च दिलात तर असंख्य साइटची माहिती मिळेल. प्रत्येकाचे काही प्लस/ मायनस पॉईंट असतातच. पण मला तरी जेनी.कॉम ही अगदी सामान्यांनाही वापरायला सुलभ राहील अशी शक्यता वाटते.

ही कॅलेंडरंही अनेक प्रकारची असतात. याहू आणि एमएसएनने स्वत:चे कॅलेंडर नेटवर ठेवले आहे. 'सनबर्ड' नावाचे मोझिला ग्रूपने काढलेले कॅलेंडर खास याच गोष्टीसाठी काढलेले आहे. या 'सनबर्ड'मध्ये खूप अतिरिक्त सोयी आहेत. ही सगळी कॅलेंडर्स चकटफू आहेत. सनबर्ड एकदा लोड करून पाहा. पण मला वापरायला सुलभ म्हणून गूगल कॅलेंडरच आवडते. कॅलेंडरवर कमी तपशील मावतो असे वाटले तर ब्लॉगद्वारे तुम्ही डायरीही ठेवू शकता. पण कॅलेंडरमधल्या बऱ्याच सोयी ब्लॉगमध्ये नसतात.

फोल्डरचा फिटनेस!

आपल्याला नको असलेल्या किंवा आता अनावश्यक ठरत असलेल्या फाईल्स काढून तरी कशा टाकायच्या? आपला कोणता फोल्डर 'हेवी' झाला आहे हे कसे जाणून घ्यायचे, फोल्डरची साइज कशी समजून घ्यायची याबाबतचे काही मार्ग. त्यांचा अवलंब केला की अनेक गोष्टी सोप्या होऊन जातात...
.
तुम्हाला तुमचा कम्प्युटर कासवगतीने चालतो असे वाटते का? मग अनावश्यक फाइल्स काढून टाकण्याचे काही मार्ग आहेत. त्याबद्दल मी मागे सविस्तरपणे लिहिलेच आहे. त्यातच काही उपायांची भर टाकत आहे. काही वेळेला या अनावश्यक फाइल्स कुठे आहेत ते कळत नाही. किंवा कोणता फोल्डर 'हेवी' झाला आहे ते लक्षात येत नाही. प्रत्येक फोल्डरवर राइट क्लिक करून प्रॉपटीजवर जायचे आणि फाइल फोल्डरचा साइझ पाहात राहायचा ही बाब फारच कंटाळवाणी आणि वेळखाऊ असते. अशावेळेस मशीनमधल्या सगळ्या फोल्डरचे साइझ एकाच दृष्टिक्षेपात दिसले तर? त्यासाठी 'फोल्डर साइझ' हा प्रोग्राम डाऊनलोड करा. सध्या याची २.४ व्हर्जन उपलब्ध आहे. गूगलवर 'फोल्डर साइझ २.४' असा सर्च द्या. तिथून 'फोल्डरसाइझ२.४.एमएसआय' ही फाइल डेस्कटॉपवर डाऊनलोड करा. डाऊनलोड संपले की त्या फाइलवर डबलक्लिक करा. मग 'रन'वर क्लिक करा. पुढील सूचना पाळा की 'फोल्डर साइझ' मशीनमध्ये लोड होईल.

आता तुमच्या डेस्कटॉपवरच्या 'माय कम्प्युटर' आयकॉनवर क्लिक करा. सगळे ड्राइव्ह दिसतील. त्यातल्या कोणत्याही ड्राइव्हवर क्लिक करा. उदा. 'सी' ड्राइव्हवर क्लिक केल्यावर त्यामधले सगळे फोल्डर दिसतील. ते फोल्डरचे आयकॉन असतील. त्यात फोल्डर साइझ दिसणार नाही. मग वरती 'व्ह्यू'वर क्लिक करून खाली 'डिटेल्स'वर क्लिक करा. आता सगळे फोल्डर एकाखाली एक दिसतील व प्रत्येक फोल्डरची पूर्ण माहिती त्यासमोर दिसेल. पण एवढे करूनही 'फोल्डर साइझ' दिसत नाही हे कसे? त्यासाठी पुन्हा 'व्ह्यू'वर जा, खाली 'चूज डिटेल्स'वर क्लिक करा. तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील. त्यातच 'फोल्डर साइझ'चे ऑप्शन दिसेल. (नुसते 'साइझ' नाही. त्यावर क्लिक असेलच) या 'फोल्डर साइझ'वर क्लिक करा. मग 'फोल्डर साइझ' शब्दावर क्लिक करून बाजूला 'मूव्ह अप' बटनावर जा. हे ऑप्शन अगदी वरून दुसरे आणून ठेवा. ओके म्हणा की प्रत्येक फोल्डरचा साइझ दिसायला लागेल. ज्या फोल्डरमध्ये अधिकाधिक फाइल्स साठल्या असतील ते पटकन कळेल व त्या अनावश्यक असल्यास काढूनही टाकता येतील. गंमत अशी की तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे 'फोल्डर साइझ'वर जसे क्लिक करून साइझ जाणून घेऊ शकता, तसेच अन्य काही ऑप्शन्सवरही क्लिक करू शकता. उदा. फोल्डर क्रिएटेड, फोल्डर चिल्ड्रन (म्हणजे एका मुख्य फोल्डरमध्ये किती सबफोल्डर आहेत) वगैरे. याची आवश्यकता प्रत्येकाला असेलच असे नाही. पण गंमत म्हणून ही ऑप्शन्स क्लिक करून पाहा.

नको असलेल्या फाइल्स काढताना टेम्पररी फाइल्स काढणे वगैरे उपाय आहेतच. परंतु, आणखी एक उपाय आहे. 'माय कम्प्युटर'वर क्लिक करा. मग 'सी' ड्राइव्हवर राइट क्लिक करा. नंतर प्रॉपटीर्जवर जा. पहिल्याच 'जनरल' टॅबमध्ये 'डिस्क क्लीनअप' वर क्लिक करा. प्रथम एक छोटा बॉक्स दिसेल आणि त्यानंतर आपोआप मोठा बॉक्स दिसेल. त्यातील 'मोअर ऑप्शन्स'वर जा. त्यात सर्वात खाली 'सिस्टिम रिस्टोअर' ग्रूपमध्ये 'क्लीनअप' असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा व ओके म्हणा. हार्ड डिस्कमधील सगळ्या अनावश्यक फाइल्स नाहीशा होतील. 'सिस्टिम रिस्टोअर' साफ करण्याचे दुसरे एक कारण म्हणजे कम्प्युटरमध्ये विविध कारणांनी हा पॉईंट तयार होत असतो. मशीन ज्या अवस्थेमध्ये आहे आणि त्यात जे प्रोग्राम्स आहेत, त्याची नोंद असलेला हा पॉईंट असतो. त्याचा साइझ खूप मोठा असतो. आपण सर्वात ताजा 'रिस्टोअर पॉईंट' ठेवून आधीचे सर्व डिलीट करायचे की मशीन हलके होते.

काही महिन्यांत 'विंडोज ७' ही प्रणाली येईल आणि बऱ्याचशा प्रमाणात अपयशी ठरलेल्या व्हिस्ताचे आयुष्य अकाली संपेल. ज्यांनी व्हिस्ता घेतलेले नाही आणि एक्सपीवरच प्रेम केले, त्यांनाही व्हिस्ताचे आकर्षण नाही असे नाही. प्रणाली एक्सपीचीच, पण दिसायला व्हिस्ता अशी इच्छा कोणाच्या मनात बळावली तर आश्चर्य वाटायला नको. मायक्रोसॉफ्टने ती इच्छा पूर्ण केली आहे. तसेच काही खाजगी कंपन्यांचे सॉफ्टवेअरही नेटवर उपलब्ध आहे. 'व्हिस्तामायझर' हे असेच एक सॉफ्टवेअर आहे. गूगलला सर्च देऊन ते डाऊनलोड करून घ्या आणि त्या फाइलवर डबलक्लिक करून ती 'रन' करा. तुम्हाला मशीन रिस्टार्ट करावे लागेल. रिस्टार्ट होतानाच मशीनचा लूक बदललेला दिसेल. नवा लूक अधिक आल्हाददायक असेल. 'व्हिस्ता स्टार्ट मेन्यू २.९२' हेही वेगळे सॉफ्टवेअर आहे. ते डाऊनलोड करा आणि आपल्या मशीनवरच्या 'स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि बघा मेन्यू कसा दिसतो ते. हे प्रोग्राम्स नको असतील तर मायक्रोसॉफ्टने असंख्य ऑप्शन्स उपलब्ध करून दिली आहेत. गूगलवर सर्च केल्यास ते कळू शकेल.

आणखी काही शॉर्टकट्स!

आपला कम्प्युटर सुरक्षित आहे का? नको असलेले प्रोग्राम सुरू झाले तर काय करायचे? कम्प्युटर अपडेट कसा करायचा? अशा अनेक प्रश्नांनी आपण गोंधळून जातो. अशावेळी काय करायचे असते त्याचा वेध...

आपण कम्प्युटर सुरू करतो तेव्हा अनेक प्रोग्राम्स आपोआप सुरू होतात. काही प्रोग्राम्स सुरू झालेले आपल्याला दिसतात, काही दिसत नाहीत. कारण ते पडद्याआड सुरू असतात. ते बऱ्याचदा आवश्यक नसतात. उदा. 'विंडोज मेसेंजर' हा कम्प्युटर सुरू होतानाच पडद्याआड चालू असतो. अशा नको असलेल्या प्रोग्राममुळे कम्प्युटर स्लो होतो. हा मेसेंजर सुरू झालाय हेच कळत नसल्याने तो बंद केला जात नाही. तो आपोआप सुरू व्हावा अशी यंत्रणा विंडोज प्रणालीतच असते. ती आपण डिसेबल करू शकतो. त्यासाठी तुमच्या 'सी' ड्राइव्हमधल्या प्रोग्राम्स फोल्डरवर क्लिक करा. त्यातील मेसेंजर फोल्डर उघडा. तिथे mmsgs.exe फाइल असेल. त्यावर डबल क्लिक करा. मेसेंजर ओपन होईल. त्यातील 'प्रेफरन्सेस' टॅबवर क्लिक करा. सुरुवातीलाच दोन ऑप्शन्स दिसतील. 'रन विंडोज मेसेंजर व्हेन विंडोज स्टार्ट' आणि त्याखाली 'अलाऊ विंडोज मेसेंजर टू रन इन द बॅकग्राऊंड' अशा दोन ऑप्शन्सवर क्लिक केलेले असेल. ते अनक्लिक करा. ओके म्हणा व मशीन रिस्टार्ट करा. आता मेसेंजर आपोआप सुरू होणार नाही. तुम्हाला हवा असेल तेव्हाच तो सुरू करता येईल. उगाचच तो चालणार नसल्याने कम्प्युटरची तेवढी मेमरी सेव्ह होईल. असे अनेक प्रोग्राम्स बंद करता येतात. पण कोणते प्रोग्राम्स आवश्यक आहेत आणि कोणते नाहीत याची नीट माहिती असल्याशिवाय ते करू नका.

आपण आपला कम्प्युटर सुरक्षित राहावा म्हणून अँटीव्हायरस व अँटीस्पायवेअर लोड करतो. एकाने भागेल का अशी शंका आल्यास आणखी एखादा असा अँटीव्हायरस आपण लोड करतो. तरीही आपला कम्प्युटर खरोखरच सुरक्षित आहे का हे आपल्याला कसे कळेल? तुमच्या कम्प्युटरवर विंडोज एक्सपी सव्हिर्स पॅक दोन अथवा व्हिस्ता लोड केलेले असेल, तर ते पाहणे सोपे आहे. त्यासाठी 'स्टार्ट' बटनवर क्लिक करा. मग 'कंट्रोल पॅनल'वर जा. तिथून 'सिक्युरिटी सेंटर'वर जा. तिथे प्रामुख्याने 'फायरवॉल', 'ऑटोमेटिक अपडेट्स' आणि 'व्हायरस प्रोटेक्शन' अशी तीन ऑप्शन्स दिसतील. ती तीनही हिरव्या रंगात 'ऑन' असा स्टेटस दाखवत असतील, तर तुमचा कम्प्युटर व्हायरस व स्पायवेअरशी मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे, असे समजा. यातील एखादी गोष्ट जरी 'ऑफ' असली तरी ती धोक्याची घंटा असते. 'ऑफ' असल्यास काय खबरदारी घ्यायची याच्या सूचनाही तिथेच दिलेल्या असतात. त्या पाळा आणि कम्प्युटर सुरक्षित बनवा.

तुमचा कम्प्युटर आऊटडेटेड झालाय; तो अपडेट करायचाय असे तुम्हाला वाटत असते. तुम्ही तुमच्या कम्प्युटर मेंटेन करणाऱ्या माणसाकडे जाता आणि अपडेट करायचे असल्याचे सांगता. तो तुम्हाला मशीनमध्ये सध्या काय काय लोड केलेले आहे ते विचारतो. काहीजण प्रोग्राम्सची नावे सांगू शकतील; पण त्याचे कुठले व्हर्जन लोड आहे हे त्यांना सांगता येईलच असे नाही. किंबहुना हा तांत्रिकपणा बहुतेकांना माहीत नसतोच. या गोष्टी स्वत:लाच माहीत हव्यात असे नाही वाटत? त्यासाठी 'स्टार्ट' बटनावर क्लिक करा व नंतर 'रन'वर क्लिक करा. खाली डाव्या कोपऱ्यात एक छोटीशी विंडो ओपन होईल. त्यात msinfo32 असे टाइप करा व ओके म्हणा. तुमच्या कम्प्युटरमधल्या प्रत्येक 'अवयवा'ची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल.

तुम्ही एखाद्या वेळेस कम्प्युटर पूर्णपणे स्कॅन करता. या स्कॅनिंगला पंधरा मिनिटांपासून दीड तासापर्यंत कितीही वेळ लागू शकतो. कम्प्युटरमध्ये फाइल्स किती आहेत, 'कम्प्लिट स्कॅन' करताय की 'स्मार्ट स्कॅन' त्यावर हा वेळ अवलंबून असतो. मग बऱ्याच वेळेस तुम्ही इतर काही काम करू शकत नाही. कम्प्युटर स्कॅनिंगला टाकून तुम्ही तुमची अन्य कामे आटोपता. पण या दीड तासात कम्प्युटर किती वीज खाईल या कल्पनेने तुम्ही घाबरत असाल. सध्या सर्वच कंपन्यांची वीजबिले ज्या झपाट्याने आकाशाकडे झेपावत आहेत, ते पाहता ही भीती रास्तच आहे. कम्प्युटर तर चालू ठेवायचाय; पण वीजही वाचवायची आहे असे करायचे असेल तर काय कराल? नुसतेच स्कॅनिंग करायचे असेल तर ते सुरू करून मॉनिटर स्वीचऑफ करू शकता. सीपीयू चालू राहील आणि मशीनचे स्कॅनिंगही होत राहील. किंवा ठराविक वेळेने मॉनिटर 'ऑफ' व्हावा अशीही सोय करता येईल. त्यासाठी स्टार्ट - कंट्रोल पॅनल - पॉवर ऑप्शन्स या मार्गाने जा. तिथे 'पॉवर स्किम्स' या पहिल्याच ऑप्शनमध्ये 'टर्न ऑफ मॉनिटर' असे दिलेले असेल व त्याखाली वेळ दिलेली असेल. '२० मिनिटांनंतर' वगैरे. ती बदलून तुम्हाला हवी असेल त्याप्रमाणे सेट करू शकता. अगदी एक मिनिटांपासून ते पाच तासांपर्यंत सेटिंग करता येते. बॅकग्राऊंडला स्कॅनिंग चालूच राहील अथवा तुम्ही जी फाइल ओपन केली असेल तीही ओपनच राहील; पण मॉनिटर ऑफ असल्याने दिसणार मात्र नाही. यामुळे विजेची बचत होईल हे महत्त्वाचे!

'फिशिंग' नको!

लोकांना फसवून त्यांची खाजगी माहिती, बँक अकाऊंट, क्रेडिट कार्डाची माहिती वगैरे काढणे याच प्रकाराला 'फिशिंग' म्हणतात. सोशल नेटवकिर्ंग करणाऱ्या साइटनाही यापासून धोका पोचू शकतो. म्हणूनच सर्वांनीच सावध राहण्याची आणि आवश्यक ते उपाय योजण्याची गरज आहे...

.....

पाकिस्तान आपल्यावर 'सायबर अॅटॅक' करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि हा 'सायबर अॅटॅक' म्हणजे नेमके काय असा प्रश्न सर्वांच्याच मनात आला. 'सायबर अॅटॅक' म्हणजे तुमच्या इंटरनेटवर केलेला हल्ला. अर्थात तो तुमचे इंटरनेट चालू असतानाच होणार. तुमचा कम्प्युटर सेफ नसला आणि त्यात चांगला अँटीव्हायरस आणि फायरवॉल नसली तर तुमचा डाटा बाहेरचा माणूस सहज चोरू शकतो. म्हणून या ठिकाणी अँटीस्पायवेअरचेही महत्त्व आहे. परंतु अलीकडच्या काळात 'फिशिंग' नावाचा तुम्हाला अलगद जाळ्यात पकडण्याचा प्रकार जास्त फोफावला आहे. याचा पहिला वापर होऊन तेरा वषेर् झाली असली तरी सध्याच्या काळात त्याचा प्रसार होण्याचे कारण कदाचित हॅकर्सपाशी अधिक सुसज्ज अशी साधने उपलब्ध झाली हे असावे. १९८७ सालीच 'फिशिंग' नावाचा काही प्रकार अस्तित्वात आहे हे लक्षात आले होते. परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर २ जानेवारी १९९६ रोजी झाल्याचे उघड झालेे. अमेरिकेच्या एओएल साइटवर हा हल्ला झाला होता. ही साइट वा त्यावरील मेल वापरणाऱ्यांना एक मेल आला आणि त्यांचे पासवर्ड, बँक अकाऊंट, क्रेडिट कार्ड नंबर यांची माहिती विचारण्यात आली. ही माहिती एओएलला अधिकृत कारणासाठी हवी आहे, असेही भासविण्यात आले. म्हणून काहीजणांनी ही माहिती दिलीही. नंतर ते फसले व आपल्या बँक अकाऊंटवरून अथवा क्रेडिट कार्डाचा वापर करून आपला खिसा कोणीतरी हलका केला हे लक्षात आले. खडबडून जागे झाल्यावर ग्राहकांच्या लक्षात आले की प्रत्यक्षात तो मेल एओएलने पाठवलाच नव्हता तर काही हॅकर्सनी पाठविला होता. परंतु, तो खरा एओएलकडूनच आला असावा इतक्या बेमालुम पद्धतीने पाठविला गेला होता. मूळ वेबसाइटसारख्या हुबेहूब दुसऱ्या वेबसाइटवरून आपल्याला काही माहिती विचारण्यात येते. सामान्य नेटयूजरला हा फरक कळत नाही आणि तो फसतो. लोकांना फसवून त्यांची खाजगी माहिती, बँक अकाऊंट, क्रेडिट कार्डाची माहिती वगैरे काढणे याच प्रकाराला 'फिशिंग' म्हणतात.

सोशल नेटवकिर्ंग करणाऱ्या साइटनाही यापासून धोका पोचू शकतो. ऑर्कुट, फेसबुक वगैरेवरचे तुमचे प्रोफाइल हुबेहुब नवे करून तुमची फसवणूक केली जाते. तुमच्या मित्रमैत्रिणीचे प्रोफाइल बनावट आहे हे लक्षात न आल्याने आपण मनमोकळेपणाने गप्पा मारतो वा खासगी माहिती देतो. जेव्हा लक्षात येते तेव्हा उशीर झालेला असतो. याचा आथिर्क फटका अमेरिकेत भल्याभल्यांना बसला आहे. मे २००४ ते मे २००५ या काळात अमेरिकेत बारा लाख लोकांना याचा फटका बसला. त्याचे आथिर्क मूल्य होते तब्बल ९० कोटी डॉलर. दरवषीर् अमेरिकन कंपन्यांना दोन अब्ज डॉलरचा तोटा होतो. २००७मध्ये हाच आकडा ३६ लाख ग्राहक आणि सव्वातीन अब्ज डॉलर असा झाला. ब्रिटनमध्येही २००५मध्ये या 'फिशिंग'चा आथिर्क फटका होता सव्वादोन कोटी पौंड. अन्य देशांत तो किती बसत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

यावर आपण काय करू शकतो? इंटरनेट एक्प्लोरर, फायरफॉक्स, सफारी, ऑपेरा या ब्राऊझर्सनी 'अँटीफिशिंग टूल' ब्राऊझरमध्ये घातलेच आहे. एखादी बोगस साइट लोड होत असली तर लगेचच तुम्हाला तसा संदेश मिळतो. त्यासाठी त्या ब्राऊझरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'अँटीफिशिंग टूल' एनेबल करावे लागेल. या ऑप्शनच्या आधी असलेल्या बॉक्समध्ये टिकमार्क असला तर ते एनेबल होईल. तुम्ही फसविले जाण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमचा वेबवरचा सर्च. तुम्ही एखाद्या साइटवर सर्च दिलात आणि समोर दिसलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर भलतीच साइट उघडली तर पंचाईत होते. म्हणून ती लिंक खरी आहे की फसवी, हे ओळखायला 'मॅकअॅफी साइटअॅडव्हायझर' नावाच्या सॉफ्टवेअरची मदत होते. नेटवरून ते डाऊनलोड केल्यावर तुमच्या स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात तळाला इंग्रजी 'एम' असे अक्षर लाल रंगात दिसेल. हाच आपला सल्लागार. इंटरनेटवरील सर्चमधून समोर आलेली लिंक खरी असली तर तिच्या शेवटी आपोआपच हिरव्या रंगातील टिकमार्क येईल. लिंक उघडण्यास धोकादायक असेल तर लाल रंगाची फुली मारलेली दिसेल. ती लिंक ओपन करू नका.

एखाद्या बनावट साइटवरून तुम्हाला बँक अकाऊंट अथवा अन्य महत्त्वाच्या बाबीची माहिती देण्यास सांगितली गेली तर एक काम करा. ज्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायला सांगितले असेल त्यावर क्लिक न करता बँकेची मूळ साइट ओपन करा व तिथे अशी काही माहिती मागितली आहे काय याचा तपास करा. प्रत्येक बँकेच्या साइटवर तुम्हाला 'आम्ही कधीही मेलवर ग्राहकांकडून पासवर्ड वा अन्य महत्त्वाची माहिती मेलवर मागवणार नाही, ती ग्राहकांनी देऊ नये', असे स्पष्ट म्हटलेले असते.

तुमची कम्प्युटर यंत्रणा किती सक्षम आहे त्यावरही फिशिंगमध्ये तुम्ही अडकाल की नाही हे ठरते. म्हणूनच नव्या वर्षाचा नवा संकल्प करा, इंटरनेट नेटवर्क सुरक्षित करा. हॅपी सफिर्ंग...!

काही 'शॉर्टकट्स!'

फोल्डरमधल्या काही मोजक्याच फाइल डीलिट करायच्या आहेत; काय करायचे? नेहमी वापरले जाणारे प्रोग्राम्स डेस्कटॉपऐवजी कुठे ठेवणे सोईचे असते? काही फोल्डर्स 'गुप्त' ठेवायचे असले तर...? तर काय करायचे या प्रश्नांची केलेली उकल...
....
नवख्या मंडळींना कम्प्युटर चालवताना काही सोप्या गोष्टीही कठीण वाटू शकतात. याचे कारण कम्प्युटर तंत्रज्ञानाबद्दल असलेली अनभिज्ञता. ही माहिती किमान मूलभूत तरी असलीच पाहिजे. काही शॉर्टकट्स, काही सोप्या युक्त्या वगैरे माहीत पाहिजेत. अशाच काही युक्त्या आपण माहीत करून घेऊ या.

समजा तुम्हाला तुमच्या फोल्डरमधल्या काही फाइल्स डीलिट करायच्या आहेत. अन्य फाइल्स घालवायच्या नाहीत. एकएक फाइल सिलेक्ट करून डीलिट करायला वेळ लागेल. अशा वेळेस एका हाताने 'कंट्रोल'चे बटन दाबून ठेवून तुम्हाला डीलिट करायच्या असतील त्या साऱ्या फाइल्स सिलेक्ट करा. उदाहरणार्थ पहिली, सातवी, दहावी अशा फाइल्स सिलेक्ट करा. सगळ्या सिलेक्ट झाल्या की 'कंट्रोल' बटनावरचा हात सोडा व एकदाच डीलिटचे बटन दाबा. त्या एकदमच डीलिट होतील व डेस्कटॉपवरच्या 'रिसायकल बिन'मध्ये जाऊन पडतील. त्या या कचऱ्याच्या डब्यात जाऊन पडाव्यात असे वाटत नसेल व थेट कम्प्युटरमधून डीलिट व्हाव्यात असे वाटत असेल तर डीलिट करताना 'शिफ्ट'चे बटन दाबून मग डीलिटचे बटन दाबा. त्या फाइल्स रिसायकल बिनमध्ये न जाता नाहीशाच होतील. पण माझ्या मते फाइल बिनमध्येच गेलेली बरी. कारण एखादी फाइल आपण चुकून डीलिट केली असे वाटले तर ती पुन्हा रिकव्हर करता येते. बिनमध्ये असलेल्या फाइलवर राइट क्लिक करा व 'रिस्टोअर फाइल' म्हणा. ती मूळ फोल्डरमध्ये जाऊन बसेल.

काही सतत वापरले जाणारे प्रोगाम्स आयकॉनच्या स्वरूपात डेस्कटॉपवर आणून ठेवले तर सुरू करायला सोपे जाते हा भाग आहेच. परंतु, डेस्कटॉपवर जास्त आयकॉन आणल्यास तो फार हेवी होतो. त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डेस्कटॉपऐवजी स्टार्ट मेन्यूवर ते आणून ठेवावेत. त्यासाठी डेस्कटॉपवरच्या 'स्टार्ट' बटनावर राइट क्लिक करा. मग 'प्रॉपटीज'वर क्लिक करा. जी ऑप्शन्स दिसतील त्यातील 'स्टार्ट मेन्यू' सिलेक्ट करा व नंतर ओके म्हणा. आता पुन्हा स्टार्ट बटनावर क्लिक करा. नंतर 'ऑल प्रोग्राम्स'वर क्लिक करा. म्हणजे तुमच्या मशीनमध्ये असलेले सगळे प्रोग्राम्स दिसतील. त्यातील जो प्रोग्राम तुम्हाला 'स्टार्ट मेन्यू'मध्ये हवा आहे त्यावर राइट क्लिक करा. तुम्हाला 'पिन टू स्टार्ट मेन्यू' असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. आता जेव्हा केव्हा हा प्रोग्राम ओपन करायचा असेल तेव्हा स्टार्ट बटनावर क्लिक केलेत की उभ्या डाव्या पट्टीत तो दिसेल. त्यावर क्लिक करा की झाले काम.

पुढची टिपही अनेकांना उपयोगी पडेल. समजा तुमचा कम्प्युटर ऑफिसमध्ये वा घरात एकापेक्षा अधिक माणसे वापरतात. अशावेळेस तुम्ही तयार केलेले काही फोल्डर्स अन्य लोकांनी पाहू नयेत वा पाहिले तर त्यात काही बदल कोणीही करू नये असे तुम्हाला वाटत असेल. मग त्यावर काय करायचे? त्यासाठी थोडी किचकट प्रोसेस आहे. तुमचे मशीन रिस्टार्ट करा आणि ताबडतोब कीबोर्डवरचे 'एफ ८' हे बटन सतत दाबत राहा. काही वेळाने कम्प्युटर 'सेफ मोड'मध्ये सुरू होईल. नेहमीच्या स्क्रीनपेक्षा अगदीच वेगळा व मोठ्या अक्षरातला हा स्क्रीन दिसेल. तिथे तुमच्या युजरनेमने लॉगीन करा. मग तुम्ही जो फोल्डर प्रायव्हेट करू इच्छिता तो शोधा. (तो 'सी' ड्राइव्हमध्ये आहे का 'डी'मध्ये वगैरे) त्या फोल्डरवर राइट क्लिक करून 'प्रॉपटीज'वर जा. नंतर 'सिक्युरिटी' टॅबवर जा. दोन भागांतला स्क्रीन दिसेल. वरच्या भागात ग्रूप ऑर युजर नेम अशा हेडखाली मशीनमध्ये ज्यांच्या ज्यांच्या नावाने मशीनला लॉगीन होऊ शकते त्याची यादी असेल. त्यातील प्रत्येक नाव आळीपाळीने सिलेक्ट करा आणि नंतर खालच्या भागात कोणते राइट्स कोणाला द्यायचे ते सिलेक्ट करा. तुमचे लॉगीन सोडून बाकी सर्वांना राइट्स 'डिनाय' म्हणजेच नाकारू शकता अथवा बाकीच्यांना फोल्डर दिसेल पण त्यात बदल करू शकणार नाही अशी सोय करायची असेल तर 'अलाऊ' सेक्शनखाली हवे तेच राइट्स द्या. दुसऱ्या व्यक्तीला 'फुल कंट्रोल' व 'मॉडीफाय'वर क्लिक करू नका. म्हणजे इतर लोक फोल्डरमध्ये काही बदल करू शकणार नाहीत. तुमच्या स्वत:च्या लॉगीनला मात्र सवं काही 'अलाऊ' हवे हे मात्र लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हालाच काही बदल करता येणार नाहीत. मग मशीन रिस्टार्ट करा.

समजा तुम्हाला एक फोल्डर वारंवार वापरावा लागतो. तोे समजा 'सी' ड्राइव्ह - डाटा- वर्ड फाइल्स- पर्सनल फोल्डर- हवा असलेला फोल्डर इतक्या लांब असेल तर प्रत्येक वेळेला तो शोधणे कठीण जाते. तोे कायम डेस्कटॉपवर आणून ठेवला तर किती काम सोपे होईल? त्यासाठी डेस्कटॉपवर राइट क्लिक करा. मग 'न्यू' आणि मग 'शॉर्टकट'वर क्लिक करा. नंतर ब्राऊज बटनावर क्लिक करून तुम्हाला हव्या त्या फोल्डरची लिंक द्या. नंतर 'नेक्स्ट'वर क्लिक करा व त्या शॉर्टकटला काहीही नाव द्या. ओके म्हणा की तो फोल्डर डेस्कटॉपवर हजर झालाच पाहिजे.

डिक्शनरी एका क्लिकवर

अपेक्षित शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी दहा पानं उलटवा, पॉकेट डिक्शनरीजच्या छोट्या प्रिण्टमधून शब्द शोधताना डोळे दुखवून घ्या, हे तसं कंटाळवाणं आणि वेळ काम. मुख्य म्हणजे डिक्शनरीचं किलोभर ओझं सोबत बाळगा या साऱ्या व्यापातून सुटका करून घेण्यासाठी तुमच्या दिमतीला सदैव तत्पर असणारा प्रकार म्हणजे ऑनलाइन डिक्शनरीज. कम्प्युटरचा सदैव वापर करणा-या टेक्नोसॅवी पिढीला सध्या हा पर्याय अधिक सोयीचा वाटू लागलाय. हजारो पानांचआणि अनेक खंडांचे शब्दकोश वापरण्याचे दिवस केव्हाच सरले. म्हणूनच काळाच्या ओघात या शब्दकोशांची जागा ऑनलाइन डिक्शनरीने घेतली.

shabdkosh.com : इंग्रजी शब्दांचे हिंदीतील अर्थ यात शोधता येतील.

itrc.iiit.net : या वेबसाइटच्या माध्यमातून विविध भाषांतील ऑनलाइन डिक्शनरी डाऊनलोड करता येतील. हिंदी, तेलगु, पंजाबी, बंगाली या भाषांतील डिक्शनरी या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

askoxford.com ( इंग्लिश-इंग्लिश) : आस्क द एक्स्पर्ट, एन्टायर ऑक्सफर्ड डिक्शनरी, कोटेशन्स डिक्शनरी, र्फस्ट नेम डिक्शनरी आणि एन्टायर युके बुक कॅटलॉग हे पर्याय या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. इंग्रजी शिकताना येणाऱ्या बहुतेक सर्व प्रकारच्या शंका ही डिक्शनरी सोडवू शकते.

acharya.iitm.ac.in : ( इंग्लिश-संस्कृत)
आचार्य मल्टिलिंग्वल कम्प्युटिंग फॉर लिटरसी अॅण्ड एज्युकेशन या मदास येथील संस्थेने तयार केलेल्या या वेबसाइटवर लर्न संस्कृत या लिंकवर क्लिक केल्यास वेळ, मानवी अवयव, आहार, निसर्ग, दैनंदिन जीवन, व्याकरणातील संज्ञा, व्यवसाय, नाती, मापे, पृथ्वी आणि अन्य उपग्रह इत्यादींसाठी पर्यायी शब्द मिळतील.

poetry.com : काव्यात स्वारस्य असणाऱ्यांसाठी तसंच ललित लेखन किंवा अनुवाद करणाऱ्यांसाठी ही वेबसाइट अतिशय उपयुक्त आहे. यातील नीड हेल्प ऱ्हायमिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यास समानाथीर् शब्द, व्याख्या, वाक्प्रचार आणि अन्यही बरंच काही मिळेल.

khandbahale.com : या वेबसाइटवर इंग्लिश-मराठी, मराठी-इंग्लिश, इंग्लिश-हिंदी, इंग्लिश-इंग्लिश अशा स्वरूपातील शब्द उपलब्ध आहेत.

oup.co.in : या वेबसाइटवरील डिक्शनरी या ऑप्शनवर क्लिक केल्यास ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी ऑनलाइन, ऑक्सफर्ड रेफरन्स ऑनलाइन, ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ नॅशनल बायोग्राफी आणि ऑक्सफर्ड ऑनलाइन असे ऑप्शन्स मिळतील.

ही केवळ काही ठळक उदाहरणं झाली. शोधायचं म्हटलं तर याव्यतिरिक्तही अनेक ऑनलइन डिक्शनरीज इण्टरनेटच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या आहेत. सर्च ऑप्शनसमोर अपेक्षित शब्द टाइप करायचा आणि एक क्लिक करायचं की एकाच शब्दाचे विविध अर्थ, त्याला प्रत्यय लागल्यानंतर अर्थांमध्ये होणारे बदल, त्याची व्याकरणातील विविध रूपे क्षणभरात सारा खजिना तुमच्यासमोर प्रकट होतो. वाक्प्रचार, म्हणी, समानाथीर्, विरुद्धअथीर् शब्द, भाषांतर, रसग्रहण सर्व स्वरूपाची मदत एका क्लिकच्या अंतरावर आहे. त्यासाठी डिक्शनरी खरेदी करण्याची गरज नाही, तिचं वजन बाळगण्याची गरज नाही किंवा पानं उलटण्यात वेळ दवडण्याचीही आवश्यकता नाही. त्यातूनही एखादा शब्दार्थ विशिष्ट साइटवर न मिळाल्यास दुसरी साइट मदतीला सज्ज असतेच.